rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'पद्मावत' च्या तिकिटाचे दर भिडले आकाशाला

padmawati release 25 jan
, बुधवार, 24 जानेवारी 2018 (09:12 IST)

संजय लीला भन्सालींच्या 'पद्मावत' चित्रपटावरून  राजपूत करणी सेना देशभरामध्ये आंदोलन करत आहे. एकीकडे पद्मावत चित्रपटाला विरोध सुरु असतानाच अनेकजण चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. ह्या  चित्रपटचे   तिकीटांचे दर प्रचंड महागडे झाले आहे.  

दिल्लीतल्या एका चित्रपटगृहामध्ये पद्मावत चित्रपटाचं एक तिकीट तब्बल २,४०० रुपयांना मिळत आहे. तर मुंबईतही चित्रपटाच्या तिकीटाचे दरही चढेच आहेत. परळच्या फिनिक्स मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये पद्मावतचे दर ९०० रुपयांपर्यंत आहेत. ठाण्याच्या व्हिवियानामध्ये पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरिमन पॉईंटच्या आयनॉक्स लासरप्लेक्समध्येतर संध्याकाळच्या शोचं तिकीट तब्बल १५५० रुपये आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑस्कर पुरस्कार : 'द शेप ऑफ वॉटर' ला 13 नामांकन