Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pathaan Review: 'पठाण' बनून शाहरुखने चाहत्यांची मने जिंकली, 'चित्रपटाला 5 स्टार रेटिंग

Pathaan Review:   'पठाण' बनून शाहरुखने चाहत्यांची मने जिंकली,  'चित्रपटाला  5 स्टार रेटिंग
, बुधवार, 25 जानेवारी 2023 (12:45 IST)
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान ' पठाण ' चित्रपटाद्वारे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे . या चित्रपटात किंग खान अॅक्शन अवतारात दिसत असल्याने चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत . या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान सैनिकाच्या भूमिकेत आहे. सकाळपासूनच चित्रपटगृहाबाहेर गर्दी झाली होती.शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे
 
सिनेमा हॉलबाहेर शाहरुख खानचे चाहते चित्रपट रिलीज झाल्याचा आनंद साजरा केला. 
'पठाण'मधील दीपिका पदुकोणची दमदार अ‍ॅक्शन पाहून तिच्यासोबत एक सोलो अॅक्शन सिनेमा बनवावा, अशी मागणी चाहते करत आहेत.

अभिनेत्री श्रुती सेठने ट्विट करून शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि पठाण यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
पठाणबद्दल सातत्याने रिव्ह्यू येत आहेत, चित्रपट पाहिल्यानंतर लोक ट्विटरवर कौतुक करत आहेत.
चित्रपटाला ट्विटरवर 5 पैकी 5 स्टार मिळाले आहे. 
 
शाहरुख खानच्या पुनरागमनाचे चित्रपट समीक्षकांनी कौतुक केले आहे. चित्रपटाला 4.5 स्टार देत हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pathaan Movie Release : चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण , इंदूरच्या चित्रपटगृहांबाहेर पठाणचा निषेध