Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बरेली विधायकाच्या मुलीवर भडकली पायल रोहतगी, म्हणाली - 'ती काही साधी भोळी नाही आहे'

बरेली विधायकाच्या मुलीवर भडकली पायल रोहतगी, म्हणाली - 'ती काही साधी भोळी नाही आहे'
, सोमवार, 15 जुलै 2019 (12:28 IST)
बर्‍याच वेळेपासून चित्रपटातून दूर असणारी अॅक्ट्रेस पायल रोहतगी सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेले व्हिडिओज आणि ट्विटमुळे चर्चेत राहते. पायल रोहतगी बर्‍याच वेळेस बॉलीवूडच्या दुसर्‍या सेलेब्सला देखील निशाण्यांवर घेत राहते. आता तिचा ऐक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तिने बरेली विधायक राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौलची मुलगी साक्षी मिश्रावर जाम भडकलेली दिसत आहे. पायलने साक्षी मिश्राच्या व्हिडिओला फारच विचारपूर्वक तयार केलेला व्हिडिओ आहे, असे म्हटले आहे.  
 
पायल रोहतगीने म्हटले की 'साक्षी मिश्राने आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. ती आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध गेली असून तिने आपल्या व्हिडिओत राजनीती शब्दाचा वापर केला आहे, ज्याने हे स्पष्ट होत आहे की ती काही भोळी भाबडी मुलगी नाही आहे. तिने फारच विचार करून हा व्हिडिओ तयार केला आहे.'
 
पायलने पुढे म्हटले की तिला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर जातिवादचा मुद्दा उठतो तर हा व्हिडिओ लवकर वायरल होईल. टीव्ही चॅनलवर यामुळे लाइव्ह वादविवाद चालत आहे कारण तिचे वडील भाजपचे विधायक आहे. मला असे वाटत आहे की साक्षी मिश्राने हा निर्णय फारच विचार करून घेतला आहे. तिला असे वाटले असेल की या प्रकारे न्यूजमध्ये बनून राहील.'
 
पायल म्हणते की 'साक्षी मिश्राने ज्या मुलासोबत लग्न केले आहे त्याच्याबद्दल बर्‍याच चुकीच्या बातम्या समोर येत आहे. असे सांगण्यात आले की त्याचे आधी 1 लग्न तुटले होते. अशात कोणत्याही 19 वर्षाच्या मुलीच्या आई वडिलांचे दुःखी होणे स्वाभाविक आहे. मला असे वाटते की मुलीचा ब्रेन वॉश झाला आहे. मुलगा कुठल्याही जातीचा असो काही प्रॉब्लम नाही पण चर्चेत सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.'
 
पायलने पुढे म्हटले -'आमच्या धर्मात जातीवाद नाही आहे बलकी राजकारण करणार्‍या नेत्यांना बढावा देण्यात आला आहे. जाणून बुजून मीडियात अशा बातम्या पसरवण्यात येत आहे कारण युपीत भाजपची सरकार आहे. या प्रकारचे वृत्त दाखवत आहे की कसे बरेच पत्रकार एंटी नॅशनल आहे.' 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"आताच्या पिढीतील इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या आईचे तिच्या बाळासाठीचे गाणे"