Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूजा बत्रा अडकली विवाह बंधनात

पूजा बत्रा अडकली विवाह बंधनात
, शनिवार, 13 जुलै 2019 (10:24 IST)
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा कोणताही गाजावाजा न करता विवाहबंधनात अडकली, प्रियकर नवाब शाहसोबत पूजा ने लग्नगाठ बांधली. दोघांनी पारंपारिक पद्धतीने विवाह केला आहे. दोघे लग्नाची रितसर नोंदणी करणार असल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. बत्राचं हे दुसरं लग्न आहे. लॉस अँजेलस येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ सोनू अहलुवालियासोबत २००३ मध्ये तिचं लग्न झालं होतं. पण २०११ रोजी तिचा घटस्फोट झाला. पूजा बत्रा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. हसीना मान जायेगी, भाई आणि विरासत हे तिचे चित्रपट प्रामुख्याने काम केले व हे चित्रपट गाजले  होते. अनिल कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या नायक चित्रपटातही पूजा दिसली होती. नवाब शाहने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाग मिल्खा भाग, दिलवाले, डॉन, टायगर जिंदा है चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवरील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या तो ‘पानिपत’ आणि ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्या रंगाने आयुष्य घडविले असा एकच रंग...