Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज

Powerful trailer
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (14:18 IST)
जय दत्तचा लीड रोल असलेला ‘तोरबाझ' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त एका निवृत्त लष्करी अधिकार्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या या लष्करी अधिकार्याकचा इतिहास अतिशय वेदनादायी, दुःखदायी असतो. काबूलमध्ये तो मुलांची क्रिकेटची टीम उभी करण्याच्या प्रयत्नात असतो.
 
मात्र अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना त्याच्या या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न  करत असतात. या कट्टरवादी संघटनेच्या म्होरक्याचे काम राहुल देव साकारताना दिसतो आहे. त्याला या  क्रिकेट खेळाडूंना आत्मघातकीय दहशतवादी बनवायचे असते.
 
संजय दत्त आणि राहुल देव यांच्यातील जुगलबंदीची कथा ‘तोरबाझ'मध्ये  दिसणार आहे. संजय दत्तने हा ट्रेलर टि्वटरवर शेअर करताना ‘जेव्हा चांगले लोक काहीच करत नाहीत, तेव्हाच वाईट लोकांचा विजय होतो' अशी कॅप्शन दिली आहे.
 
काही महिन्यांपूर्वीपर्यंत संजय दत्त फुस्फुसाच्या विकारावर उपचार घेत होता. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे काही आठवड्यांपूर्वीच समजले होते. आता त्याच्या ‘तोरबाझ'ची स्टाईलच सांगेल की आता त्याच्या अॅूक्टिंगमध्ये किती दम उरला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद