कोरोनाचा धोका असूनही राधिका पोहोचली लंडनला
, बुधवार, 25 मार्च 2020 (12:36 IST)
सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोना व्हायरसबद्दल बोलले जात आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांना या व्हायरसचं संक्रमण झालं आहे. पण काही महत्त्वाच्या कामासाठी मात्र लोकांना घराबाहेर पडणं भाग आहे. अशा धोकादायक परिस्थितीत राधिका आपटेला सुद्धा लंडनला जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर या सर्व प्रवासाचा अनुभव तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राधिका आपटे नेहमीच भारत ते लंडन असा प्रवास करत असते. पण कोरोना व्हायरसचा धोका असताना लंडनला जाणं खरं तर तिच्यासाठी जोखमीचं होतं. मात्र तरीही ती लंडनला निघाली होती. ज्यामुळे तिचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्यासोबत काम करणारे सर्व जे माझी काळजी करत आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की, मी सुरक्षितपणे लंडनला पोहोचले आहे. सर्व रिकांम होतं त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. हीथ्रो एक्स्प्रेस पूर्णपणे रिकामा होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीनं कोणतरी दिसत होतं. राधिकानं तिच्या पोस्टमध्ये तिला मेसेज करून चौकशी करणार्या सर्वांचे आभार मानले आहेत.
पुढील लेख