सुपरस्टार रजनीकांत यांनी अलीकडेच आपला 67 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यानिमित्त अनेक चाहते अनेक उपक्रम करीत असतात.
चेन्नईतील सिटी सेंटर मॉलमध्ये त्यांच्या अशाच चाहत्यांनी 6700 कपकेक्सचे एक मोझाईक पोर्टेट तयार केले. त्यांची किंमत दोन लाख रुपये होती. बटन्स कपकेक्सने यासाठी पुढाकरा घेतला होता. या बेकरीच्या सुचित्रा कार्तिक यांनी सांगितले की या उपक्रमासाठी एक महिन्यापासून नियोजन करण्यात आले होते.
हे केक बेक करण्याची प्रक्रिया 72 तास सुरु राहिली. आम्ही थलैवाचे मोठेच चाहते असून अतिशय उत्साहाने हा उपक्रम केला. अनेकांनी या कपकेक मोझाईकबरोबर सेल्फी टिपून घेतेले. थलैवाची गाणीही याठिकाणी वाजवण्यात येत होती. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजीनकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला. कर्नाटकात ते बस कंडक्टर होते व नंतर अभिनयाचे शिक्षण घेऊन त्यांनी तामिळनाडूमध्ये चित्रपटात काम करणे सुरु केले. एक मराठी माणसाचा हा प्रवास थक्क करणाराच आहे.