‘बाहुबली 2’ आणि रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या सिनेमांमध्ये रिलीजआधीच दोन्ही चित्रपटांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यात ‘बाहुबली 2’ च्या ट्रेलरने व्ह्यूव्जच्या बाबतीत रजनीकांत यांच्या ‘कबाली’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. पण ‘2.0’ ने सॅटेलाईट राईट्सच्या बाबतीत ‘बाहुबली 2’ ला मागे टाकलं आहे. ‘2.0’ च्या हिंदी, तेलुगु आणि तामीळ व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 110 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तर ‘बाहुबली 2’ला 78 कोटी रुपयांतच समाधान मानावं लागलं. 78 कोटींपैकी हिंदी व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 50 कोटी रुपयांना खरेदी केले आणि मल्याळम, तामिळ आणि तेलुगु व्हर्जनचे राईट्स 28 कोटी रुपयात खरेदी करण्यात आले.