श्रुती हसन आणि तथाकथित प्रियकर मायकल कोरसेल यांच्याबद्दल आतापर्यंत खूपदा बोलले गेले आहे. मुंबई विमानतळावर त्यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यातल्या नात्याबद्दल अधिकच बोलले जात आहे, पण त्यांच्या या नात्याची कमल हसन यांना भलतीच चिंता लागून राहिली आहे. त्यांची चिंता एवढी वाढली की, कमल यांच्या निकटवतीयाने सांगितले की, श्रुती त्याच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी फिरते याची कमल यांना काळजी वाटते. सार्वजनिक ठिकाणी अशापद्धतीने फिरल्यानंतर प्रसारमाध्यांमध्ये कशाप्रकारच्या बातम्या येतील, याचीच त्यांना अधिक काळजी वाटते. एवढच काय तर कमल यांनी यासंदर्भात श्रुतीशीही चर्चा केली, असे त्यांच्या निकटवतीयांनी सांगितले. कमल हसन यांचा युके-इंडिया सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मायकलसोबतचा फोट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्य गेल्या होत्या. अगदी थोड्याच वेळात हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. मायकेल कोरसेलने ड्रामा सेंटर लंडनमधून पदवी संपादन केली आहे.