Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chhatriwali 'छतरीवाली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रकुल प्रीत सिंग देणार सेक्स एजुकेशन

chhatriwali trailer out
, शनिवार, 7 जानेवारी 2023 (15:23 IST)
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा आगामी चित्रपट 'छतरीवाली'ची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. लैंगिक शिक्षणावरील हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म G5 वर प्रदर्शित होणार आहे. नुकताच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
 
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रकुल प्रीत सिंग एका गंभीर विषयावर अतिशय हटके पद्धतीने बोलताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात समाजातील लैंगिक शिक्षणाविषयीच्या रूढींपासून होते. शाळेत लैंगिक शिक्षण हा विषय झाला आहे, पण शिक्षकांना तो शिकवायला लाज वाटते.
 

ट्रेलरमध्ये रकुल शालेय परीक्षांमध्ये लैंगिक शिक्षणाला ऐच्छिक करण्याऐवजी अनिवार्य करण्याची लढाई लढताना दिसत आहे. त्याच वेळी, शाळेचे प्राध्यापक स्वतः हा विषय निषिद्ध विषय मानतात.
 
'छतरीवाली' चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस विजय देवस्कर यांनी केले आहे. या चित्रपटात रकुल प्रीतसोबत सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया आणि सुमीत व्यास हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 20 जानेवारी रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाआधी बिपाशा बसूचे 3 पुरुषांशी होते संबंध