Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ranveer Singh: बोल्ड फोटोशूटमुळे रणवीर सिंग अडचणीत, अभिनेत्याविरोधात तक्रार

ranvir singh
, मंगळवार, 26 जुलै 2022 (10:12 IST)
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतो. जेव्हापासून अभिनेत्याने हे फोटोशूट केले आहे, ज्यावर लोक आणि सिनेतारकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता अभिनेता रणवीर सिंगवर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. 
 
अभिनेत्याचे न्यूड फोटो समोर आल्यापासून त्याला ट्रोल केले जात होते. एवढेच नाही तर त्याच्यावर अनेक प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले. मात्र आता या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याविरुद्धच्या तक्रारीत रणवीर सिंगवर 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) पदाधिकाऱ्याने चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
तक्रारदाराने अभिनेत्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला सोमवारी एका एनजीओशी संबंधित व्यक्तीकडून अर्ज आला. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. आम्ही चौकशी करत आहोत."रणवीरचे हे न्यूड फोटो समोर आल्यापासून तो वादात सापडला आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर आता यावर राजकारणही सुरू झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kahaani Ghar Ghar Kii 2:पार्वतीची कहाणी 14 वर्षांनी परतणार, झी टेलिव्हिजनने फेटाळून लावली एकता कपूरची ऑफर