बॉलीवूडचे क्यूट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची खास बांडिंग पाहण्या सारखी आहे. रणवीर सिंगने फिल्म गल्ली बॉयमध्ये अभिनयासोबत आपली गायन प्रतिभा दर्शविल्यानंतर मुंबईमध्ये आपले संगीत लेबल इंकइंक लाँच केले आहे.
या लॉन्चिंग इवेंटदरम्यान रणवीरने आपल्या पत्नी दीपिका पादुकोणशी संबंधित एक रहस्य देखील उघडलं आहे. रणवीरने सांगितले की दीपिका पदुकोण एक महान गायिका आहे. रणवीर म्हणाला की माझी बायको खूप चांगलं गाणं गाते. ती उत्कृष्ट सिंगर आहे, पण ती फक्त माझ्यासाठी गाते.
रणवीरने आपल्या संगीत लेबलवर बोलताना सांगितले की आमची कंपनी मर्यादित नाही. त्यांचे लेबल प्रत्येकासाठी खुले आहे आणि दीपिकाही त्यात सामील झाल्यास त्याला खूप आनंद होईल. रणवीरने या प्रसंगी तीन उदयोन्मुख हिप हॉप गायक देखील लॉन्च केले. कामाबद्दल बोलू तर दीपिका पादुकोण सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती एसिड सर्वइव्हच्या भूमिकेत दिसणार आहे. तिथे रणवीर सिंग 83 चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तो कठोर प्रशिक्षण घेत आहे.