Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हजारो प्रवासी मजुरांना अभिनेता सोनू सूद छत देणार आहे

webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (11:26 IST)
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवलं. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि आता याच प्रवासी मजुरांसाठी (Right home for thousands of migrant workers)अभिनेता सोनू सूद छत देणार आहे. प्रवासी मजुरांना त्यांचं हक्काचं घर देणार आहे. सोनू सूदने 20 हजार मजुरांसठी नोएडामध्ये घर ऑफर केलं आहे.
 
सोनू सूदने प्रवासी मजुरांना घर देणार असल्याची माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. सोनूने ट्वीट केलं आहे, "20 हजार प्रवासी मजुरांना मी आता घर ऑफर करत आहे. प्रवासी रोजगारच्या माध्यमातून ज्या मजुरांना नोएडामध्ये काम मिळालं आहे, त्यांना मी घर देऊ इच्छित आहे. नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष ललित ठकुराल यांच्या मदतीने मला हे साध्य करता येत आहे."
webdunia

कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी(Right home for thousands of migrant workers) परतण्यासाठी धडपडू लागले. वाहतूक बंद असल्याने त्यांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला. त्यावेळी सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला आणि या मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय गेली.
 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

उत्सुकता संपली, मिर्झापुर २ 'या' रिलीज होणार