बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खानने आयुष शर्मासोबत लग्न केलं आहे. आयुष- अर्पिताचे दोन मुलं देखील आहेत. त्यांच्या मुलांचे नाव आहिल आणि आयत असे आहेत. आयतला अर्पिताने मागील वर्षी 27 डिसेंबर रोजी जन्म दिला आहे.
अलीकडेच आयुषने आपल्या मुलांच्या नावावर मोठा खुलासा केला आहे का त्याने आपल्या मुलांचे मुस्लिम नावं ठेवले. एका मुलाखतीत आयुष शर्माने म्हटले की मी आणि अर्पिता धर्मनिरपेक्ष नात्यावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आम्ही आपल्या मुलांचे नाव मुस्लिम आणि आडनाव हिंदू ठेवू.
आम्ही मुलांचे नाव अक्षर ए (A) पासून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. एकदा मी लंडनसाठी प्रवास करताना मला एक आहिल नावाचा व्यक्ती भेटला. मला त्याचं नाव काही वेगळं वाटलं आणि मी त्याचा अर्थ शोधला तर फारशीत त्याचा अर्थ राजकुमार असा होता.
आयुष शर्मा आणि अर्पिता खान याचं लग्न 18 नोव्हेंबर 2014 रोजी झालं होतं.