संजय दत्तच्या आगामी बायोपिकची जोरदार चर्चा होत असतानाच तो पुन्हा एकदा आता चाहत्यांना खलनायकाच्या भूमिकसत दिसणार आहे. तो रणबीर कपूरच्या आगामी 'शमशेरा' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
संजय दत्त 'शमशेरा'च्या निमित्ताने पहिल्यांदाच 'यशराज फिल्मस'च्या बॅनरअंतर्गत काम करणार आहे. शमशेरा म्हणजेच रणबीरची भूमिका करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात ताकदीची आणि निर्भीड असल्यामुळे तेवढ्याच ताकदीचा किंबहुना त्याहून क्रूर खलनायक निवडणे गरजेचे होते. करण जोहरने यासाठी संजय दत्तच्या नावावर शिक्कामोर्तब केला. संजय दत्त याबद्दल म्हणाला की, यश चोप्रा आणि माझे वडील यांच्यात चांगली मैत्री होती. माझा हा यशराज फिल्म्स अंतर्गत पहिलाच चित्रपट असल्याने मी फार खूश आहे. रणबीरविरोधात खलनायकी भूमिका साकारण्यासाठी मी फार उत्सुक आहे.