Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 March 2025
webdunia

‘दिल बेचारा' पाहताच साराची पोस्ट

‘दिल बेचारा' पाहताच साराची पोस्ट
, सोमवार, 27 जुलै 2020 (14:49 IST)
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या  करिअरमधील अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा' 24 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सुशांतला अखेरचे पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. त्यामुळे  चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात अभिनेत्री सारा अली खाननेदेखील इन्स्टाग्रामवर दिल बेचारामधील सुशांत आणि सैफचा एकत्र फोटो शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘दिल बेचारा' हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण भावुक झाले आहेत. यात केदारनाथ या चित्रपटात सुशांतसोबत स्क्रीन शेअर केलेल्या साराने सुशांतसाठी एकपोस्ट शेअर केली आहे. यात सुशांत आणि सैफ अली खानमध्ये कोणत्या गोष्टीचे साम्य आहे हे तिने सांगितले आहे. केवळ या दोन पुरुषांनी माझ्याशी वॅनघोष, क्रिकेट, पिंक फ्लॉयड, नुसरत साहू आणि अभिनयातील काही कंगोरे या विषयावर चर्चा केली. तुमच्या दोघांमध्ये ही एक गोष्ट समान होती.
 
दिल बेचारा डिस्नी प्लस हॉटस्टारवर, अशी पोस्ट साराने लिहिली आहे. ‘दिल बेचारा' या चित्रपटात सैफ अली कॅमिओ रोलमध्ये झळकला असून त्याने अभिमन्यू वीर ही भूमिका वठविली आहे. या निमित्ताने सैफ आणि सुशांतला एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. साराने केदारनाथमध्ये सुशांतसोबत काम केले होते. हा चित्रपट गाजला नसला तरी देखील सुशांत आणि साराच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जोहर हाजीर हो, होणार चौकशी