पहिल्याच ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आगमन केलेल्या संयामी खेरने पदार्पणातच फिल्मफेअर पटाकवले आहे. वेगळ्या धाटणीच्या पेहरावातून फॅशनिक ऑयकॉन ठरू पाहणाऱ्या संयामीला फिल्मफेअर ग्लॅमर अॅँड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.
फिल्मफेअर अवॉर्डसचा सोहळा नुकताच मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. त्यात बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, अलिया भट, जॅकलीन फर्नांडीस यांच्याबरोबरीने संयामीला स्थान मिळाले. सोबतच इमर्जिंग फेस अँड फॅशन इन बॉलिवूड म्हणून संयामीचा विशेष उल्लेख करण्यात आला.