किंग खानला विनाकारण बॉलिवूडचा बादशाह म्हटले जात नाही. प्रेक्षक त्याच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखचे चाहते देशातच नाही तर जगभरात आहेत. शाहरुखचे डायलॉग्स, त्याचा लूक सर्वच चाहत्यांना आवडतो. केवळ देशातच नाही तर जगभरातील लोक त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. शाहरुख खानच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्याला एम्पायर या प्रसिद्ध मासिकाने जगातील 50 महान कलाकारांच्या यादीत स्थान दिले आहे. या यादीत बॉलीवूडमधील शाहरुख खान हा एकमेव अभिनेता आहे.
एम्पायर मॅगझिननेही शाहरुख खानचे कौतुक केले आहे. नियतकालिकाने म्हटले आहे की खानचे करिअर आता चार दशके 'अखंड हिट्सच्या जवळ आहे आणि त्यांचे चाहते अब्जावधीत आहेत'
या मासिकाने शाहरुखच्या अनेक चित्रपटांचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये देवदास, माय नेम इज खान कुछ कुछ होता है आणि स्वदेशमध्ये किंग खानची व्यक्तिरेखा हायलाइट करण्यात आली आहे. एवढेच नाही तर २०१२ मध्ये आलेल्या जब तक है जान या चित्रपटातील त्याचा संवाद- 'जिंदगी तो हर रोज जान लेती है... बम तो सिरफ एक बार लेगा' ही त्याच्या कारकिर्दीची आयकॉनिक लाइन म्हणून ओळखली जाते.
यादीत हॉलिवूड अभिनेते डेन्झेल वॉशिंग्टन, टॉम हँक्स, अँथनी मार्लन ब्रँडो, मेरील स्ट्रीप, जॅक निकोल्सन आणि इतर अनेकांचा समावेश आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील प्रमुख भूमिकेत आहेत.