Publish Date: Fri, 01 Sep 2017 (14:44 IST)
Updated Date: Fri, 01 Sep 2017 (14:57 IST)
लागोपाठ फ्लॉप चित्रपटांमुळे शाहरुख खानचा आत्मविश्वास थोडा खालावला आहे आणि आता लोक असे म्हणू लागले आहे की किंग खानचा वेळ आता गेला. फिल्म इंडस्ट्रीत जमून राहण्यासाठी शाहरुखला आता निर्मातेच्या रूपात जास्त सक्रिय व्हायचे आहे. यश राज फिल्म्सप्रमाणे त्याला देखील आपले बॅनर उभे करायचे आहे.
असे वृत्त आहे की आता तो एक हॉरर चित्रपट तयार करण्याची योजना आखत आहे. त्याला असे हॉरर चित्रपट तयार करायचे आहे जे आतापर्यंत बनले नसतील. त्याचे म्हणणे आहे की भारतात हॉरर चित्रपट चांगले बनत नाही. जे बनतात त्यातून 90 टक्के सी ग्रेडचे असतात.
तुम्ही जर हा विचार करत असाल की शाहरुख यात काम करेल तर ते चुकीचे आहे. कारण मोठ्या स्क्रीनवर रोमांस करणारा हीरो कसा प्रेक्षकांना घाबरवू शकतो? त्याच्या या चित्रपटात काही स्थापित तर काही नवीन कलाकार असतील.