शाहीद - मीराला मुलगा झाला

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:20 IST)
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर ची पत्नी मीरा राजपूतने एका मुलाला जन्म दिला. प्रसुती वेदना सुरू झाल्याने मीराला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी ४ च्या सुमारास मीराला मुलगा झाला. या दोघांना २ वर्षांची एक मुलगी आहे जिचे नाव मीशा असे आहे. त्यावेळी रूग्णालयात मीराची आई, शाहीद कपूरचे वडिल आणि अभिनेते पंकज कपूर, इशान खट्टर हे सगळेही उपस्थित होते अशीही माहिती मिळते आहे.
 
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१६ ला मीशाचा जन्म झाला. ती आता दोन वर्षांची झाली आहे. अनेक सेलिब्रेटीजनी ट्विट करत शाहीद आणि मीरा यांचे अभिनंदन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दिलीप कुमार लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल