Publish Date: Mon, 12 Nov 2018 (11:08 IST)
Updated Date: Mon, 12 Nov 2018 (11:14 IST)
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या वर्षी दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहे. यांचे विवाह 7 जुलै 2015 ला झाले होते. 2016 मध्ये त्यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला आणि तिचा नाव मीशा ठेवले. हे नाव शाहीद आणि मीराच्या नावांना जोडून शाहीद ने ठेवले होते. या वर्षी 5 सप्टेंबरला त्यांना मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी जैन कपूर ठेवले आहे. याबद्दल मुलाच्या जन्मापासूनच संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे आणि हा खास प्रसंगही साजरा करत आहे.
शाहिद कपूर यांनी चाहत्यांना मुलाचे नाव आधीच शेअर केले आहे पण जैन कपूर याचे पहिले फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अशात मीरा राजपूत यांनी जैनचा पहिला फोटो 'हॅलो वर्ल्ड' कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जैन खूप गोड आहे आणि मीरा सारखा दिसतो. सोशल मीडियावर शेअर केल्या बरोबर हा फोटो वायरल होऊ लागला. ट्विटरवर देखील हे नाव खूप ट्रेंड करू लागला.
काही लोकांनी जैन याची तुलना करीना कपूर खानचा मुलगा, तैमूरशी केली. त्यांच्यामते जैन अगदी तैमूर सारखा दिसत आहे. कामाविषयी बोलूतर शाहिद कपूर लवकरच चित्रपट अर्जुन रेड्डीचा रीमेक गब्बर सिंहमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गाणे 'उर्वशी' रिलीज करण्यात आले होते. हनीसिंह यांच्या आवाजात हे गाणे रिलीज झाल्यानंतर, हे यूट्यूबवर ट्रेड करू लागले. या गाण्यात शाहीद कपूर आणि कियारा आडवाणी खूप छान दिसत आहे.
webdunia
Publish Date: Mon, 12 Nov 2018 (11:08 IST)
Updated Date: Mon, 12 Nov 2018 (11:14 IST)