Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

शाहरुखची मुलगी सुहानाचा सेल्फी बघून यूजर्सला वाटतेय काळजी

Shahrukh Khan daughter Suhana selfie
शाहरुख खानची मुलगी त्या स्टार किड्समध्ये सामील आहे जे नेहमी चर्चेत असतात. ती जेव्हाही सोशल मीडियावर फोटो शेअर करते काही मिनिटातच ते व्हायरल होऊ लागतात. पण लेटेस्ट व्हायरल सेल्फीमुळे यूजर्स काळजीत पडले आहे. 
 
अलीकडेच सुहानाने एक सेल्फी फोटो आपल्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यात ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसतेय. ट्यूब टॉप केरी करत तिने गळ्यात लहानसा पेंडेट देखील घातले आहे. पण हा फोटो सुहानाच्या बोल्डनेसमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 
 
सुहानाने ही सेल्फी आरशासमोर घेतली आहे आणि त्यात तिच्या फोनचा कव्हर देखील दिसत आहे. त्यात तिने एटीएम कार्ड ठेवलेले आहे. मग काय, यूजर्सचं लक्ष सुहानापेक्षा तिच्या एटीएम कार्डावर गेलं आणि लोकांना काळजी वाटू लागली. 
 
सुहाना तर सर्वात श्रीमंत शाहरुख खानची मुलगी आहे आणि तिने कार्ड आपल्या फोनच्या कव्हरमध्ये ठेवले आहे ज्यात लाखो रुपये असतील. 
 
यावर यूजर्सचे वेगवेगळे कमेंट्स येत आहे ज्यात सुहानाबद्दल चर्चा होत नसून कार्डबद्दल विचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्भवती समीरा रेड्डीचा बोल्ड फोटोशूट