बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका अभिनेत्री सोबत रात्री फिरताना त्याचा व्हिडीओ समोर आल्यावर तो अभिनेत्रीला डेट करण्याचा चर्चा सुरु झाल्या. अभिनेता शिव कोणाला डेट करत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर हा अभिनेता अभिनेत्री डेजी शाह सोबत दिसला. शिव अभिनेत्री डेझीच्या गाडीतून दिसला. त्यांना येतांना पाहून फोटोग्राफर्सने त्यांच्या गाडीच्या समोर उभे राहून फोटो काढण्यास सुरु केले. त्यांना पाहून शिवने गाडीचा काच खाली केला आणि त्यांच्याशी बोलणार की डेजी ने त्याच्या तोंडावर हात ठेवला. या मुळे शिव आणि डेझी डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहे.
डेझी 2022 साली प्रदर्शित 'मिनिस्ट्री ऑफ टॅट्यू' या चित्रपटात दिसली होती. त्या पूर्वी तिने 2018 साली प्रदर्शित रेस 3 या चित्रपटात दिसली. तिने 2019 साली एका गुजराती चित्रपटात देखील काम केले आहे.
शिव ठाकरे हा बिगबॉस मध्ये दिसला आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले घर केले. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.