गायक मिका सिंग पूरग्रस्तांसाठी 50 घरे बांधून देणार

शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (09:58 IST)
गायक मिका सिंगने  सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरं बांधून देणार आहे. नुकतंच मिकाने पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स केला म्हणून सिनेवकर्स इंडियन असोसिएशननं त्याच्याव बंदी घातली आहे. याप्रकरणामुळे वादात आला आहे. 
 
मिका म्हणाला, की, “संपूर्ण देश या मदतीसाठी एकत्र यावा. विशेषत: माझ्या बॉलिवूडमधील मित्रांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला, तर मी 50 घरं बांधणार आहे, त्याची संख्या आपल्यामुळे हजारांवर पोहचू शकते. संपूर्ण देशाने मदत केली तर हजारो घरं बांधून होतील…जय महाराष्ट्र, जय हिंद”, असं मिका म्हणाला. नुकतंच मिकाने पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स केला म्हणून सिनेवकर्स इंडियन असोसिएशननं त्याच्याव बंदी घातली आहे. याप्रकरणामुळे वादात असलेल्या मिकाने आता  जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वाढदिवसानिमित्त सैफच्या ‘लाल कप्तान’चा टीजर रिलीज