Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोहाला कन्यारत्न

soha ali khan
मुंबई , रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:55 IST)
अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. सोहाने नवरात्रीत मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
 
सोहाची आई अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पती, अभिनेता कुणाल खेमू सोहासोबत रुग्णालयात आहेत. सोहा आणि
 
बाळ सुखरुप असल्याची माहिती कुणालने ट्‌विटरवरुन दिली आहे.
नवरात्रीत सोहाला कन्यारत्न प्राप्त झाल्याने पतौडी आणि खेमू कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करिना कपूरला मुलगा झाला होता. त्यामुळे छोट्या तैमूरला खेळण्यासाठी बहीण मिळाली आहे. एप्रिल महिन्यात सोहाचा बेबी बम्प दिसायला लागल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर कुणालने ट्‌विटरवरुन या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. सोहा आणि कुणाल हे दोघे 25 जानेवारी, 2015 रोजी विवाहबंधनात अडकले होते.
 
सोहाने 2004 मध्ये “दिल मांगे मोअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे “रंग दे बसंती’, “साहेब बिवी और गॅंगस्टर रिटर्न्स’ यासारखे काही चित्रपट गाजले. 2016 मध्ये रिलीज झालेले “31 ऑक्‍टोबर’ आणि “घायल वन्स अगेन’ हे तिचे प्रेग्नन्सीपूर्वीचे शेवटचे चित्रपट होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन