Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 March 2025
webdunia

आपल्या बुजरेपणावर मात करून अभिनय कलेत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी सन्नी देओल परदेशात गेला

sunny deol
, शनिवार, 15 मार्च 2025 (14:20 IST)
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 च्या एक आकर्षक भागासाठी तयार व्हा, कारण या वीकएंडला सन्नी देओल विशेष भाग सादर होणार आहे. ‘जाट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे कलाकार- सन्नी देओल, रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार यावेळी उपस्थित असणार आहेत. या विशेष भागात ‘आयडॉल का आशीर्वाद फेस’ रागिणी ‘जब हम जवां होंगे’ हे गाणे सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल. यावर सन्नी पाजींची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया अजिबात चुकवू नका.
सन्नी देओल म्हणाला, “रागिणीचे गाणे ऐकताना मी या गाण्याच्या शूटिंगच्या काळात पोहोचलो. हे गाणे चित्रित करण्यासाठी आम्हाला बरेच दिवस लागले कारण हवामान सारखे बदलत होते आणि योग्य वातावरण मिळवण्यासाठी आम्हाला वाट बघावी लागत होती. संपूर्ण चित्रपट म्हणजे आमच्यासाठी जणू एक सहलच होती.

आम्ही खूप धमाल केली. हा चित्रपट माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळचा आहे आणि खूप आनंद देऊन गेलेला! आम्हाला अजिबात टेंशन नव्हते, जास्त विचार आम्ही केला नव्हता फक्त मजा केली होती. तू ज्या पद्धतीने गायलीस, ते ऐकताना मी पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचलो! मला हे देखील आठवते आहे की, माझ्या लहानपणीची भूमिका सोनू निगमने केली होती.”
त्यानंतर बादशाहने सन्नीला विचारले, “तुला चित्रपटात अभिनय करायची इच्छा आहे असे तुला कधी जाणवले? लहान असल्यापासून ते ठरलेलेच होते का?” यावर सन्नी देओलने उत्तर दिले, “माझ्या लहानपणी मी या सगळ्यापासून खूप लांब होतो. पण शेवटी ते रक्तातच होते ना! माझ्यात एक भाग असा होता, ज्याला हे विश्व हवेसे वाटत होते. मी माझ्या वडिलांसोबत मोठा झालो. त्यांचा प्रत्येक चित्रपट मी पाहिला. आणि जाणीवपूर्वक नाही, पण नकळत आपणही हेच करायचे ही खूणगाठ मनाशी बांधली.

आम्ही लहान होतो, तेव्हा आमचे लक्ष खेळण्यातच असायचे, अभ्यासात आमचे लक्ष नव्हते. काहीतरी खोड्या काढत असायचो. पण शालेय जीवनानंतर आपल्याला काय करायचे आहे, हे ठरवण्याची वेळ आली. त्यावेळी मी ठरवले की मला अभिनेता व्हायचे आहे. त्यावेळी मी 19-20 वर्षांचा असेन. तेव्हा मी खूप बुजरा होतो.
ALSO READ: क्राइम पेट्रोलमध्ये अनुप सोनी परतला: 26 हत्यांचे प्रकरण तुम्हाला खिळवून ठेवणार
मी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचे ठरवले. मी परदेशी गेलो, एका थिएटर स्कूलमध्ये शिकलो, जेथे कुणीच मला ओळखत नव्हते. मी तेथे काम करू लागलो आणि हळूहळू माझ्यात आत्मविश्वास आला. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. मग मी इथे आलो, खूप आकांक्षा बाळगून आलो, बेताब, अर्जुन, डकैत आणि इतर चित्रपटात काम केले.”
 
संगीत, भावना आणि किस्से यांनी भरलेला हा इंडियन आयडॉल 15 चा विशेष भाग तुम्हाला सुरेल आठवणी देऊन जाईल. बघायला विसरू नका, या शनिवारी आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ चित्रपट निर्माते देब मुखर्जी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन