अर्जुन पटियाला या चित्रपटात सनी लिओनी एक मोबाइल नंबर बोलते. काही प्रेक्षकांनी हा नंबर सनीचा असेल असे समजून त्यावर कॉल करायला सुरू केले, परंतू तो नंबर सनी लिओनीचा नसून दिल्लीत राहणार्या पुनीत अग्रवाल नावाच्या एका तरुणाचा आहे. सतत राँग नंबर घेऊन पुनीत जाम कंटाळला आहे की हा नंबर सनीचा नाहीये.
पुनीतकडे रोज शंभराहून अधिक कॉल येत असून सर्वांना सनीशी बोलायची इच्छा आहे. पुनीतने त्रस्त होऊन शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अर्जुन पटियाला 26 जुलै रोजी रिलीज झाला असून त्या दिवसापासूनच पुनीतला फोन येणे सुरू झाले. फोन करणारे सनीबद्दल चौकशी करत सनीशी बोलायचे असे म्हणतात.
सुरुवातीला तर पुनीतला नेमकं काय घडतंय कळलेच नाही नंतर माहीत पडले की 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात सनी एक मोबाइल नंबर बोलते आणि हा नंबर पुनीतचा आहे. सिनेमा बघत असलेल्या प्रेक्षकांना हा नंबर सनीचा असावा असं वाटतंय.
अखेर पुनीत यांनी पोलिस स्टेशनात जाऊन चित्रपट निर्माता आणि सनी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तरी सनीशी बोलायचे म्हणून फोन येणे सुरूच आहे.