हॅलोविन लूकमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोल

अभिनेत्री स्वरा भास्कर एका वेगळ्याच कारणाने ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी स्वराच्या हॅलोविन लूकची जबरदस्त खिल्ली उडवली आहे. स्वराने केलेल्या डार्क मेकअपमुळे तिच्या ओठांच्यावर काळपटपणा आला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला तुला मिश्या आल्या का? मिशा स्वच्छ तरी करून यायच्या होत्या, अशा भयंकर शेरेबाजी करत ट्रोल केले आहे.
 
स्वराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा हॅलोविन लूक शेअर केला होता. यात तिने आॅफ शोल्डर टॉप आणि लॉन्ग स्कर्ट सोबत सिल्व्हर ज्वेलरी घातली आहे. तिची हेअरस्टाईल देखील अगदी विचित्र असून कपाळाच्या वर तिने मोठ्या मोठ्या फुलांचा फुलोरा तयार केला आहे. तिचा मेकअप देखील डार्क आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कौन बनेगा करोडपतीच्या खेळात चक्क मांजरीची एन्ट्री