तेजश्री प्रधानचा किसिंग सीन

मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (17:54 IST)
सर्वांची आवडती सून म्हणजेच तेजश्री प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात ती शर्मन जोशीसोबत झळकणार आहे. पण या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिने एक किसिंग सीन दिल्यामुळे जोरदार चर्चा सुरु आहेत.
 
हा ट्रेलर पाहता त्यामध्ये तेजश्रीने शर्मनसोबत किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बबलू बॅचलर’ हा कॉमेडी चित्रपट असून याचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. 
 
येत्या २० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख जर वाघ तुझ्या मागं लागला तर काय करणार