rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘बाला’चा ट्रेलर नुकताच रिलीज

The 'Bala' trailer just released
, शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (10:46 IST)
बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना आता पुन्हा एकदा ‘बाला’ भन्नाट विनोदी चित्रपटात आपली वेगळी भूमिका साकरताना दिसणार आहे.नुकताच  ‘बाला’चा ऑफिशिअल ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला प्रक्षेकांचा चांगला प्रतिसाद दिला आहे.
 
या चित्रपटामध्ये आयुष्मान केस गळतीच्या समस्येशी सामना करताना दिसणार आहे. पण या गंभीर समस्येमध्ये ज्याप्रकारे कॉमेडीचा वापर करण्यात आला आहे तो अंदाज सर्व प्रेक्षकांना हा ट्रेलर बघूनच आवडेल यात शंका नाही.
 
या चित्रपटात आयुष्यमान खुराना मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या चित्रपटात भूमि पेडणेकर, यामी गौतम, सीमा भार्गव, अभिनेता सौरभ शुक्ला आणि मनोज पहवा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

... आणि 'गर्ल्स' 'ची 'मॅगी' सापडली!