Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

जास्तीत जास्त काम आणि चांगले निकाल मिळविणे हे या वर्षाचे प्राथमिक लक्ष्य : काजोल

जास्तीत जास्त काम आणि चांगले निकाल मिळविणे हे या वर्षाचे प्राथमिक लक्ष्य : काजोल
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:21 IST)
अभिनेत्री काजोल ही नव वर्षाबद्दल खूप आशावादी आहे आणि या वर्षासाठी तिने काही लक्ष्य निश्चित केली आहेत. ती म्हणते, आम्हाला 2020 मध्ये नको असतानाही ब्रेक मिळाला होता. आपल्यापैकी बर्यातच जणांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, आत्मविश्वास नसल्यास हे नवे वर्षही आपल्याला निराशाजनक ठरेल. यासाठी उत्तम आरोग्य, जास्तीत जास्त काम आणि चांगले निकाल मिळविणे हे या वर्षाचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे. हे वर्ष निश्चितच आपल्यासाठी बर्या च नवीन आणि अनोख्या संधी देईल, असे सांगत काजोलने चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. यावर असंख्य चाहत्यांनी काजोलचे समर्थन केले आहे. 
 
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास काजोल लवकरच त्रिभंगा चित्रपटातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब अजमाविणार आहे. या चित्रपटाची कथा मुंबईवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे करणार आहे. दरम्यान, काजोल गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर तानाजी : द अनसंग वॉरियरमध्ये दिसली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विकी बनणार ‘अश्वत्थामा'