Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा समूहाची वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

टाटा समूहाची वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (13:03 IST)
एयर इंडियाची मालकी आता अधिकृतरित्या टाटा कंपनीकडे आली आहे. भारतामधील आघाडीचे यशस्वी उद्योजक टाटा या कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास दाखवणारी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचे वृत्त मिळत आहे. टाटा समूहाने मागील 200 वर्षात काय काम केले आहे. याची संपूर्ण माहिती त्यांचा प्रवास ,टाटा समूहाचा संपूर्ण इतिहास या वेब सिरीज मधून दिसणार आहे. 
 
गिरीश कुबेर लोकसत्ताचे संपादक यांनी लिहिलेल्या ''The Tatas: How a Family Built a Business and a Nation' या पुस्तकाचे हक्क एका चित्रपट निर्मिती करणाऱ्या प्रोडक्शन हाऊस ने विकत घेतले आहे. आणि हे प्रोडक्शन हाऊस लवकरच ही वेबसिरीज बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार आहे. या सीरिजचे तीन सिझन असतील.असे प्रोडक्शन हाऊस च्या अधिकाऱ्याने सांगितले. 

या वेबसिरीज मध्ये टाटा समूह कसा उभारला  त्यांचे समाजासाठीचे योगदान या संदर्भात माहिती देखील असणार आहे. टाटा समूहाचा संपूर्ण इतिहास आणि आताचे कार्य या संदर्भात माहिती असणार आहे.  येत्या 6-7 महिने या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरु  होणार आहे. या सीरिजचे कथानक लिहून झाल्यावर सीरिजसाठी कास्टिंग केले जाणार .असे प्रोडक्शन हाऊस च्या एका व्यक्तीने सांगितले .   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवावर वादग्रस्त वक्तव्य करून अभिनेत्री श्वेता तिवारी अडकली, एफआयआर दाखल