‘ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपट प्रदर्शित होऊन काही तासही उलटत नाही तोच तो ऑनलाइन लीक झाला. ‘तमिलरॉकर्स’या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईटवरून तो लीक झाला. विशेष म्हणजे तीन भाषांमधून HD क्वालिटीचा हा चित्रपट लीक करण्यात आला आहे. काही चाहत्यांनी तमिल फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलमध्ये तक्रार करून याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
यापूर्वीही या वेबसाईटवरून अनेक चित्रपट लीक झाले आहे. म्हणूनच या वेबसाईटवर योग्य ती आणि कठोर कारवाई करावी, असं मत अनेकांनी मांडलं आहे. ‘तमिलरॉकर्स’ या वेबसाईटवरून यापूर्वी काही चित्रपट लीक झाले होते. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांचा ‘काला’चित्रपटदेखील याच वेबसाईटवरून लीक झाला होता. तेव्हा देखील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबधीत साईटवर कारवाई करण्याची मागणी केली होती.