Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह'चा ट्रेलर रिलीज

कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेरशाह'चा ट्रेलर रिलीज
, सोमवार, 26 जुलै 2021 (15:03 IST)
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'शेर शाह' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कारगिल युद्धावर आधारित या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​कारगिल युद्धाचा नायक कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारताना दिसणार आहे.
 
कॅप्टन विक्रम बत्राच्या कथेची झलक 2 मिनिट 55 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​देशभक्तीपर डायलॉग्स बोलताना दिसत आहे.
 
'शेरशाह' हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या अगदी अगोदर,12 ऑगस्ट 2021 पासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल.विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासह कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय शिव पंडित,राजअर्जुन,प्रणय पचौरी,हिमांशू अशोक मल्होत्रा,निकितीन धीर,अनिल चरणजीत, साहिल वैद्य,शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्यासारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
 
आम्ही सांगू इच्छितो की 7 जुलै 1999 रोजी युद्धामध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. सिद्धार्थ मल्होत्रा ​​अगोदर अभिषेक बच्चनने एलओसी चित्रपटामध्ये स्क्रीनवर विक्रम बत्राची व्यक्तिरेखासुद्धा साकारली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पृथ्वीच्या नाभीत वसलेले महाकालेश्वर मंदिर