Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

'सनी'चं व्हलगर गाणं काढू पाहताय संजूबाबा

'सनी'चं व्हलगर गाणं काढू पाहताय संजूबाबा
अभिनेता संजय दत्तमध्ये वाढत्या वयानुसार बरीच परिपक्वता येत असल्याचे दिसते. तुरुंगावरुन शिक्षा भोगून परतल्यानंतर वादविवादापासून शक्य ति‍तक्या दूर राहयचे त्याने ठरवले असावे. यासाठी त्याने सनी लिओनीच्या गाण्याला कात्री लावण्याचा आग्रह धरला आहे.

सध्या त्याचा भूमी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात सनी लिओनीचे एक हॉट आयटम साँग आहे. ते चित्रपटातून हटवावे अथवा एडिट करुन छोटे करावे असा आग्रह संजूबाबाने निर्मात्याकडे धरला आहे.
 
ट्रिपी ट्रिपी या बोल्ड गाण्यावर सनी लिनोनीने तिच्या स्टाईलमध्ये कडक हॉट डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर हे गाणे खूप वाजते आहे. या गाण्यावर स्वत: सनी लिओनीदेखील खूश आहे. मात्र हे गाणे अधिक भडक व्हल्गर असल्याचे संजय दत्तला वाटत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजाच्या चरणी झाले 'तुला कळणार नाही' चे म्युझिक लाँच