Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध विनोदवीर जगदीप यांचे निधन

प्रसिद्ध विनोदवीर जगदीप यांचे निधन
, गुरूवार, 9 जुलै 2020 (08:41 IST)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद (८१) यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं.  जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. त्यांची शोले या चित्रपटातील सुरमाँ भोपाली  साकारलेली ही भूमिका फार गाजली होती.
 
जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्यप्रदेशातील दतिया या जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांनी बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून भूमिका साकारण्यास सुरूवात केली. अब दिल्ली दूर नही, मुन्ना, हम पंछी डाल के हे बालकलाकार म्हणून त्यांनी साकारलेले चित्रपटही गाजले होते. त्यानंतर त्यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटापासून विनोदी भूमिका साकारण्यास सुरूवात केली. 
 
गेली अनेक वर्षे ते बॉलिवूडमध्ये कार्यरत होते. तसंच त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जगदीप यांनी अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघं आपल्या नृत्य कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुष्मान खुरानाने कुटुंबाला एक आलिशान घर भेट दिले