आई-वडील झाल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या आपल्या मुलीसोबत खास क्षण एन्जॉय करत आहेत. आणि आता चाहते त्यांच्या मुलीची एक झलक आणि तिचे नाव जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या राजकुमारीचे नाव खूप खास ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कपूर कुटुंबातील सर्वात लहान चिमुकलीचे नाव तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्याशी जोडले जाईल. एका मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव स्वतःच्या नावाऐवजी ऋषी कपूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जर रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचे नाव ऋषी कपूरच्या नावावर ठेवले तर ते संपूर्ण कपूर कुटुंबासाठी तसेच नीतू कपूरसाठी खूप खास असेल. अहवालात असेही म्हटले आहे की कपूर कुटुंबाने त्यांच्या छोट्या प्रिन्सेस साठी नाव शॉर्टलिस्ट केले आहे आणि ते लवकरच चाहत्यांसह चांगली बातमी शेअर करू शकतात.
सध्या रणबीर कपूरच्या हातात 'अॅनिमल' हा चित्रपट आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंग दिसणार आहे, तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.