Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रचार करतांना गोविंदाला माहिती न्हवते उमेदवाराचे नाव, 'आदरणीय' म्हणून वेळ धकावली

प्रचार करतांना गोविंदाला माहिती न्हवते उमेदवाराचे नाव, 'आदरणीय' म्हणून वेळ धकावली
, सोमवार, 6 मे 2024 (12:04 IST)
लोकसभा निवडणूक 2024 : महायुती उमेदवारीसाठी निवडणूक निवडणूक प्रचार करण्यासाठी आलेले गोविंदा यांना उमेदवाराचे नावाच माहित न्हवते. त्यांनी श्रीरंग आप्पा बार्ने यांना 'आदरणीय' संबोधित केले. मग नंतर जवळ बसलेल्या भाजप आमदारांना त्यांनी उमेदवाराचे नाव विचारले. 
 
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार-प्रसार सुरु आहे. या दरम्यान महाराष्ट्र मधील पुणे मध्ये पिंपरी-चिंचवड परिसरात एक आश्चर्य व्यक्त करणारी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड येथे महायुतीचे उमेदवारसाठी निवडणूक प्रचार करण्यासाठी आलेले अभिनेता गोविंदा यांना उमेदवाराचे नावाचं माहीत न्हवते. पत्रकार परिषद दरम्यान श्रीरंग आप्पा बार्ने यांना गोविंदा यांनी 'आदरणीय' म्हणून संबोधित केले. उमेदवाराचे नाव माहित नसल्यामुळे गोविंदा पत्रकार परिषद दरम्यान गोंधळलेले दिसले. 
 
मावल लोकसभा सीटमधून श्रीरंग अप्पा बार्ने हे महायुतीचे उमेदवार आहे. जे वर्तमान सांसद देखील आहे. यांकरिता प्रचार करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांना आंमत्रित केले गेले होते. गिविंदाला पाहण्यासाठी दूरुनदुरुन लोक आले होते. सर्व लोक उत्साहित होते. 
 
आतापर्यन्त उमेदवाराने केलेले चांगले काम सांगण्यासाठी हॉटेल अल्पाइन मध्ये ही पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. तसेच इथे आपल्या भाषणाची सुरवात करतांना अभिनेता गोविंदाने 'आदरणीय' असे नाव उच्चारले. उमेदवाराचे नाव माहित नसल्यामुळे पुढे त्यांचा काय परिचय द्यावा यामुळे ते गोंधळले. मग यांनी जवळ बसलेले बीजेपी आमदार उमा खापरे यांना उमेदवाराचे नाव विचारले.  

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे