Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार

गौतम बुद्धांचे 10 अनमोल विचार
* भूतकाळावर लक्ष देऊ नये, भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन वर्तमानावर केंद्रित करा.
 
* ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. म्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की मी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.
 
* हे लोकं कसे आहेत. सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य - असत्य दोन्ही मांडतात, अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे.
 
* सत्यवाणीच अमृतवाणी आहे, सत्यवाणीच सनातन धर्म आहे। सत्य, सदर्थ आणि सधर्मावर संत सदैव दृढ असतात.
 
* असत्य बोलणारे नरक भोगतात. आणि ते ही नरकात जातात जे करून, आम्ही केले नाही असे म्हणतात.
 
* ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंबदेखील त्याच्या हृदयात नाही.
 
* सभेत, परिषदेत किंवा एकांतात कोणाशीही खोटे बोलू नये. खोटे बोलण्यासाठी दुसर्‍याला भाग पडू नये. असत्य बोलण्यासाठी प्रोत्साहित करू नये. असत्याचा परित्याग केला पाहिजे.
 
* जीवनात हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करणे सर्वोत्तम ठरेल. मग जीत नेहमी आपलीच होणार, ही जीत तुमच्याकडून कोणीच हिसकावून घेऊ शकणार नाही.
 
* हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल.
 
* संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तृष्णात्याग, नैतिकता आणि धम्म