टॅक्स स्लॅब/ कररचना
उत्पन्न – टॅक्स रेट
0 ते अडीच लाख – शून्य
2.5 लाख ते पाच लाख – 10 टक्के (तीन हजारांची अतिरिक्त सूट )
5 लाख ते दहा लाख – 20 टक्के
दहा लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के
कररचेनत कोणतेही बदल नाहीत
ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारापर्यंतचं व्याज करमुक्त, बँका टीडीएसही कापणार नाहीत (पूर्वीची मर्यादा 10 हजार)
कस्टम ड्युटी अर्थात आयात करात वाढ, मोबाईल, टीव्ही महागणार
आयकरात तब्बल 90 हजार कोटींची वाढ झाली
कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त
19.25 लाख नवे करदाते, नोटाबंदीमुळे कर भरणारे वाढले
प्रत्यक्ष करात 12.5 टक्क्यांनी वाढ
यंदा 8.7 कोटी करदात्यांनी कर भरला
कच्चा काजूवरील कस्टम डयुटी 5 वरुन अडीच टक्के केली.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, एका टक्क्याची वाढ - अरुण जेटली
आधार
व्यक्तिगत व्यावसायिकांनाही आता युनिक आयडी बंधनकारक होणार
गुंतवणूक
2018-19 साठी निर्गुंतवणुकीचं उद्दीष्ट 80 हजार कोटी, गेल्या वर्षीचं उद्दीष्ट पूर्ण
क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
तीन विमा कंपन्या एकत्र करुन एक कंपनी स्थापन होईल, तीच शेअर मार्केटला लिस्ट होईल.
अर्थसंकल्प मांडला जात असतानाच शेअर बाजार 250 अंकांनी कोसळला.