Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

असा झाला बजेट शब्दाचा उगम

budget 2018-2019
दरवर्षी सादर होणार्‍या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. या अर्थसंकल्पासाठी आपण अगदी सर्रास बजेट असा शब्द वापरतो. परंतू बजेट हा शब्द नेमका आला कुठून हे तुम्हाला माहीत आहे का?
 
भारतीय राज्यघटनेत मुळात बजेट असा शब्दच नाही. त्याऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख केला गेला आहे. परंतू बजेट या शब्दाचा जन्म साधारण मध्ययुगीन काळात झाला, असे म्हणता येईल.
 
ब्रिटिश संसद ही जगभरातील इतर सगळ्या संसद आणि संसदीय परंरांची जननी मानली जाते. बजेट हा शब्दही त्याला अपवाद नाही. या शब्दाचा प्रथम वापर 1733 नंतर करण्यात येऊ लागला. बजेट शब्दाच्या जन्माची कहाणीदेखील रंजक आहे. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान आणि अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोला 1733 मध्ये जेव्हा संसदेत देशातील वित्तीय व्यवस्थापनाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आले.
 
चामड्याच्या बॅगेला पूर्वी फ्रेंच भाषेत बाउज तर लॅटिनमध्ये बुल्जा असे म्हणत. इंग्रजीत चामड्याच्या बॅगसाठी बॉगेट हा शब्द वापरला जाऊ लागला. पुढे याचाच अपभ्रंश होत बुजेट शब्द वापरात आला आणि कलांतराने बजेट शब्दाचा वापर रुढ झाला. हाच शब्द आज जगभरात वापरला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करंज पाणबुडीचे जलावतरण