Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Career in MD Radiodiagnosis : रेडियोडायग्नोसिस मध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती, पगार जाणून घ्या

Radiology
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (09:07 IST)
MD Radiodiagnosis किंवा Doctorate of Medicine Radiodiagnosis : हा डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम आहे जो 3 वर्षांच्या कालावधीसाठी आयोजित केला जातो. हे अभ्यासक्रम पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी इत्यादी विषयांवर केंद्रित आहेत. एमडी रेडिओडायग्नोसिसमध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना एमसीआय मान्यताप्राप्त विद्यापीठातून एकूण किमान 55 % गुणांसह एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. भारतातील MD रेडिओडायग्नोसिस कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी, एखाद्याला NEET PG ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या कोर्स साठी लागणारी पात्रता, व्याप्ती, अभ्यासक्रम, पगार, जाणून घेऊ या.
 
 
पात्रता  -
*  एमसीआय द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS किंवा वैद्यकीय क्षेत्रातील समकक्ष पदवी अभ्यासक्रमाची पदवी. 
* एमडी रेडिओ डायग्नोसिस कोर्स करण्यासाठी एमबीबीएस पदवीमध्ये किमान 55% गुण प्राप्त केले पाहिजेत. 
*  उमेदवारांनी NEET-PG प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. 
*  त्यानंतर उमेदवारांनी NEET-PG परीक्षा उत्तीर्ण करून GD/PI फेरी देखील पूर्ण करावी.
*  तसेच काही महाविद्यालये उमेदवारांना त्याच क्षेत्रातील काही कामाचा अनुभव किंवा 27 - 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यास सांगतात.
 
 
प्रवेश प्रक्रिया-
भारतातील जवळपास सर्वच संस्थांमध्ये एमएससी मेडिकल अॅनाटॉमीची प्रवेश प्रक्रिया वेगळी आहे. काही महाविद्यालये या अभ्यासक्रमात गुणवत्तेवर आधारित प्रवेश देतात, तर काही महाविद्यालये राष्ट्रीय स्तरावर NEET-PG किंवा राज्य किंवा स्वत:च्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेतात. ज्यासाठी उमेदवार महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. .
 
 
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -
• 12वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
 • प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक (लागू असल्यास) 
• पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
 • कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट 
• मायग्रेशन सर्टिफिकेट 
• प्रोव्हिजनल सर्टिफिकेट 
• 5 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो 
• जात / जमातीचे प्रमाणपत्र (SC/ST उमेदवारांचे)
• दिव्यांग असल्यास प्रमाण पत्र 
 
अभ्यासक्रम 
• श्वसन प्रणाली 
• मॅमोग्राफी आणि ब्रेस्ट इंटरव्हेशन
• गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जीआयटी) 
• प्रॅक्टिकल शेड्युल - भौतिकशास्त्र 
• जेनीटो युरिनरी सिस्टम
• कार्डिओ वेहस्क्युलर रेडिओलॉजी 
• न्यूरो - रेडिओलॉजी 
• रेडिओलॉजी आपत्कालीन औषध
 • सामान्य रेडिओलॉजी 
• अॅनाटॉमी 
• हेपॅटो - बिलियरी  - पँक्रॅटीक सिस्टम 
• प्रॅक्टिकल रेडिओलॉजी
• मसक्यूलोस्केलेटल सिस्टम
• पॅथॉलॉजी • कॉन्ट्रास्ट मीडिया 
• बेसिक सायन्स रिलेटेड टू द स्पेशालिटी ऑफ रेडिओ -डायगोन 
 
करिअर स्कोप -
एमडी रेडिओडायग्नोसिस कोर्स पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील रुग्णालये, वैज्ञानिक अभ्यास, खाजगी दवाखाने, संशोधन केंद्रे इत्यादींमध्ये नोकरी मिळू शकते. ज्यामध्ये विद्यार्थी रेडिओग्राफर, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ डायग्नोस्टिक्स टेक्नॉलॉजिस्ट म्हणून आपले करिअर विकसित करू शकतात. 
 
 रेडिओलॉजी तंत्रज्ञांना 12 ते 17 लाख वार्षिक पगार मिळू शकतो जो अनुभव आणि कौशल्याने वाढतो. एमडी रेडिओडायग्नोसिस केल्यानंतर, विद्यार्थी मोठ्या संस्थांमध्ये आणि परदेशातही संशोधन कार्यासाठी जाऊ शकतात. आजकाल अनेक खाजगी वैद्यकीय संस्था आहेत ज्या एमडी रेडिओ डायग्नोसिस शोधत आहेत आणि चांगला पगार देतात. 
पगार- 
• रेडिओग्राफरचे प्रति वर्ष सरासरी पगार 3,00,000 ते 29,00,000 
• रेडिओलॉजिस्ट प्रति वर्ष सरासरी पगार 19,00,000 ते 22,00,000 
• हेल्थ डायग्नोस्टिक्स टेक्नॉलॉजिस्ट प्रति वर्ष सरासरी पगार 13,00,000 ते 35,00,000 
• रेडिओलॉजी तंत्रज्ञ प्रति वर्ष सरासरी पगार 17,00,000 ते 21,00,000
 
महाविद्यालय- 
•  केपीसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जाधवपूर
• VIMS बंगलोर - वैदेही इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर 
• श्री गुरु गोविंद सिंग त्रिशताब्दी विद्यापीठ, गुडगाव 
• BJMC पुणे - BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 
• एनएमसीएच सासाराम - नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल 
•  श्रीमती एनएचएल म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, अहमदाबाद 
• MGIMS सेवाग्राम - कस्तुरबा हेल्थ सोसायटी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल 
• सायन्सेस स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, ग्रेटर नोएडा 
• डॉ बीआर आंबेडकर मेडिकल कॉलेज, बंगलोर
• एसजीटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, गुडगाव 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मूर्ख मित्र- पंचतंत्र कथा