Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीएसटी तज्ज्ञ व्हायचे आहे, तर मग हे कोर्स करा

जीएसटी तज्ज्ञ व्हायचे आहे, तर मग हे कोर्स करा
, बुधवार, 30 डिसेंबर 2020 (11:45 IST)
भारतात टॅक्स सुधारण्याच्या दिशेने जीएसटी एक मोठे पाऊल मानले जाते. गुडस आणि सर्व्हिसेज टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर हे एक क्रांतिकारक पाऊल होते आणि संपूर्ण देशात एक समान कर लावण्याच्या भूमिकेला नाकारता येऊ शकत नाही. या पूर्वी बरेच प्रकाराचे टॅक्स किंवा कर असायचे जे वेगवेगळ्या ठिकाणी असायचे आणि त्यांच्या मुळे रेड टॅपिझम देखील फुलत होते. पण आता काळ बदलला आहे आणि जीएसटी लागू झाल्यावर आता या व्यावसायिकांची मागणी आहे, जे या अभ्यासक्रमात तज्ज्ञ आहेत, जे समजू शकतील आणि समजावू देखील शकतील की ग्राहकांसाठी काय चांगले आहे आणि काय फायदेशीर नाही, विशेषतः करांच्या बाबतीत !  
 
29 मार्च 2017 रोजी हा कायदा संसदने सम्मत केला, तर 1 जुलै 2017 पासून हा संपूर्ण देशात लागू झाला. छोट्या व्यापारींसाठी हे अधिक चांगले मानले जाते कारण सर्व शासकीय औपचारिकता आणि परवानग्या घेण्याच्या प्रक्रियांना कमी करण्यात आले आहेत. तसेच लॉजिस्टिक देखील सुलभ झाले आहे. तर असंघटित क्षेत्र देखील रेग्युलेट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत आपल्याला देखील या क्षेत्रात तज्ज्ञ बनायचे आहे का? 
 
चला तर मग ह्याची तपशील घेऊ या, पण या पूर्वी जाणून घेऊ या की जीएसटीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते काम समाविष्ट आहे.
 
जीएसटी व्यवहाराची नोंदणी किंवा ट्रॅन्जेक्शन चे रजिस्ट्रेशन सर्वात पहिले येते. होय, या कामात आपले 20 लाखाहून अधिकाचे टर्नओव्हर असेल तर एक करपात्र नागरिक म्हणून जीएसटीची नोंदणी करण्या योग्य आहात. लक्षात असू द्या की, या मर्यादेमध्ये आपण नोंदणी न केल्यास दण्डाचे पात्र होऊ शकतात.

या नंतर जीएसटी रिटर्नची गोष्ट येते. या मध्ये वेगवेगळे फॉर्म असतात, या मध्ये विक्री, खरेदी आणि इतर कर इत्यादींचा तपशील भरावा लागतो. 
 
या नंतर तिसरे काम  जीएसटी अकाउंटिंगचे या मध्ये बारकाईने कॅल्क्युलेशन ला चेक करतात आणि विविध व्यवसाय आणि आपल्या संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. या नंतर चवथ्या क्रमांकावर जीएसटी रेकॉर्डची गोष्ट येते. येथे रेकॉर्ड मेंटेन केले जाते. ह्याला ड्राफ्ट रेकॉर्डस रुल्स देखील म्हणतात, या मध्ये ऍडिशनला जीएसटी अकाउंटिंग आणि रेकॉर्ड किपींग रिक्वायरमेंट समाविष्ट केले जाते. हे सर्व गोष्टी शिकल्यावर आपल्याला बाजरपेठेत बऱ्यापैकी संधी मिळण्याची शक्यता आहे. 
 
पण प्रश्न असा उद्भवतो की या साठी कोणचे कोर्स चांगले आहेत ?
सर्वप्रथम बिगनर कोर्स येतो. बिगनर कोर्सला आपण डिप्लोमा देखील म्हणू शकता, या साठी 12 वी उत्तीर्ण आवश्यक आहे. आपल्याला 24 ते 48 तास कक्ष प्रशिक्षण दिले जाते आणि सर्व जीएसटी च्या मूलभूतांची माहिती दिली जाते. साधारणपणे हे अभ्यासक्रम सहजपणे बाजारपेठेत 5000 रुपयापर्यंत उपलब्ध होतात. या नंतर जीएसटी इंटरमीडिएट कोर्स करू शकता. होय, बिगनर कोर्स नंतर हे कोर्स आपल्या समोर येतो आणि ह्या मध्ये प्रॅक्टिकल माहिती दिली जाते. अकाउंट्स आणि मॅनेजर साठी देखील हे कोर्स चांगले मानले जाते, आणि इ-लर्निंगच्या माध्यमाने हे कोर्स पूर्ण करतात. सुमारे 60 तास, ह्याचे प्रशिक्षण पुरेसे आहे. हे कोर्स 6000 रुपयात उपलब्ध आहे.
 
टॅली इआरपी -
हे 12 वी उत्तीर्ण झालेले मुलं देखील करू शकतात. या मध्ये मॅथमॅटिकल कम्प्युटेशन देखील समाविष्ट आहे. कोणतीही कंपनी आपल्या बॅलन्स शीटला खर्च आणि इतर अकाउंटशी जुडलेल्या हिशोबाला मेंटेन करण्यासाठी आजच्या काळात इआरपी वापरतात. आपल्याला देखील ऑनलाईन हा कोर्स करावयाचा आहे तर जास्तीत जास्त 40 तासात हे पूर्ण करू शकता. हे कोर्स 3000 ते 4000 रुपयांत उपलब्ध आहे.तज्ज्ञ स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी 12 वी पर्यंतचे शिक्षण अनिवार्य आहे, परंतु 135 तासाची ऑनलाईन किंवा वर्ग प्रशिक्षण घ्यावे लागते. नंतर परीक्षा दिल्यावर आपण जीएसटी मध्ये तज्ज्ञ स्तराचे डिप्लोमा धारक म्हणवले जातात. या कोर्स साठी सुमारे 12 ते 14 हजाराची फीस भरावी लागते.
 
जीएसटी बिझनेस मॅनेजमेंट -
आपण 12 वी उत्तीर्ण आहात तर  या कोर्समध्ये जाऊ शकता. सुमारे 8 हजार रुपये देऊन आपण 60 तासाचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकता. 
 
आता आपल्याला समजले असेल की वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्स कशा प्रकारे फायदा देऊ शकतात. या शिवाय आयसीएआय (ICAI)म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ने देखील जीएसटी अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे.हे जीएसटीचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट अभ्यासक्रम मानले जाते. जर आपल्याला 
 
असेच अभ्यासक्रम दुसऱ्या विद्यापीठातून करावयाचे असेल तर डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ, सारख्या संस्था जीएसटी अभ्यासक्रम करवीत आहे. सांगण्यात येत आहे की दिल्ली विद्यापीठ देखील जीएसटी वर अभ्यासक्रम सुरू करणार आहे, पण महत्त्वाची बाब अशी की आपण या क्षेत्रात किती आवड घेता आणि कोणत्या पद्धतीने आपल्या करिअरला पुढे घेऊ इच्छिता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी! रेलवे भरती मंडळाने एनटीपीसीच्या रिक्त पदांची संख्या वाढविली