Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु

webdunia
शनिवार, 21 मे 2022 (21:31 IST)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सन 2022-2023 करीता विद्यापीठाचा पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 31 मे 2022 पर्यंत आहे.
 
आरोग्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरीता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमार्फत पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व सामाईक प्रवेश परीक्षेव्दारे प्रवेश प्रक्रिया आरोग्य विज्ञान विद्यापीठाडे अर्ज मागविण्यात येत आहेत.आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
 
आरोग्य शिक्षणात संशोधनाकरीता मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व अभ्यागत यांची पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शक शिक्षकांकडे प्रवेशित असलेले विद्यार्थी व संशोधन केंद्रातील विद्यार्थी यांना प्रवेश प्रक्रिया परीक्षेनंतर विहित पध्दतीने प्रवेश देण्यात येईल.
 
विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर अधिसुचना क्र. 18/2022 मध्ये माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी व अभ्यागतांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पीएच.डी. अभ्यासक्रमासंदर्भात शैक्षणिक पात्रता, नांेदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरुप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर निदेश क्रमांक 01/2020 प्रसिध्द करण्यात आले आहे.
 
पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षा व अनुषंगिक माहितीसाठी पालक, विद्यार्थी व अभ्यागतांनी 253-2539196 किंवा 0253-2539206 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाचे गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीव्र उष्णतेतून मेंदी आपल्याला कसे आराम हे जाणून घ्या