Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makeup Artist मेकअप आर्टिस्ट म्हणून कॅरिअर बनवा

beauty
, गुरूवार, 14 जुलै 2022 (13:36 IST)
आजच्या काळात कोणीही ऑफिसात वेळेला बांधून काम करणे इच्छुक नाही.प्रत्येक जण काही तास आपल्या आवडीचे काम करून मासिक पगारापेक्षा जास्त कमाई करण्याची क्षमता ठेवतात.तर या पेक्षा अधिक चांगलं काय असणार ? कॅरेक्टर मेकअप किंवा पीरियड यासारख्या विशेष पद्धतींसाठी आपण आपल्या आवडीनुसार एक खास मेकअप कोर्स निवडू शकता.
 
आपण मेरी के आणि एव्हन सारख्या कंपन्यांसह मेकअप कोर्स देखील शिकू शकता.जे त्यांच्या स्वत: च्या मेक-अप कलाकारांच्या यश आणि विकासावर लक्ष केंद्रित करतात. सुरुवातीच्या टप्प्यात या कोर्सनंतर सुमारे 60 हजार ते एक लाख रुपये कमवू शकता आणि अनुभवानंतर वर्षाकाठी तीन लाख ते पाच लाख रुपये कमवू शकता.
 
तरुणांमध्ये क्रेझ वाढत आहे
आपण आपल्या प्रियजनांना मेकअपशी संबंधित काही टिप्स देता ?आपण बदलत्या ट्रेंड आणि फॅशन अनुसार मेकअप करण्याची पद्दत देखील बदलता जर असच आहे तर आपण आपल्या या आवडीला किंवा या छंदाला दाबू नका.  आणि 'मेकअप आर्टिस्ट'च्या क्रांतीमध्ये सामील व्हा.
 
सर्जनशीलता आणि कल्पनेसह, आपल्याला सुरुवातीच्या काळात अनेक तास स्टुडियोत काम करावे लागू शकते.परंतु दररोज नवीन प्रयोग करून या क्षेत्रात आपली आवड वाढवण्याचा प्रयत्न करा.
 
बऱ्याच मोठ्या समारंभात मेकअप कलाकारला आपल्या सीमेत राहून मानसिक तणावातून निघावे लागते.जर आपली इच्छाशक्ती दाणगी असेल तर आवड सकारात्मकतेने वाढेल.अनुभवा नंतर,आपण नामांकित ब्युटी पार्लर,कॉस्मेटिक कंपनी, जाहिरात एजन्सी, फिल्म प्रोडक्शन कंपनी, मॅगझिन किंवा फॅशन डिझायनरमध्ये सामील होतात.तर आपल्यासाठी यश आणि प्रसिद्धीचे नवीन मार्ग उघडतात.
 
मेकअप विभाग
 
कोणत्याही मेकअप विभागात सामान्यतः चार प्रकारचे लोक काम करतात:
 
की मेकअप आर्टिस्ट(मेकअप विभागाचा प्रभारी)
 
मेकअप आर्टिस्ट (मेकअप मॅन)
 
मेकअप सहाय्यक (सहाय्यक)
 
मेकअप इफेक्ट कलाकार (प्रोस्थेटिक्स, लेटेक्स आणि अ‍ॅनिमेट्रोनिक्सद्वारे विशेष प्रभाव देणारे कलाकार) व्यावसायिक स्तरावर मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी कॉस्मेटोलॉजी स्कूल ही एक महत्वाची पायरी आहे. हे अनिवार्य नसले तरी,आपले करिअर मजबूत बनविण्यासाठी हे आपल्याला शैक्षणिक पात्रता देऊ शकते.
 
येथे आपल्याला कॉस्मेटिकपासून रंग सिद्धांतापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीबद्दल शिकवले जाते. एकदा आपण कोर्स पूर्ण केल्यानंतर,आपण कोणत्याही फिल्म कंपनी, थिएटर,फॅशन हाऊस इ. मध्ये सामील झाले, तर आपल्यासाठी हे चांगलेच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Best Time to Drink Coffee कॉफी पिण्यासाठी ही वेळ आरोग्यासाठी हानिकारक, योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घ्या