Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“संगीत देवबाभळी”मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात

dev bhabali
, गुरूवार, 14 जुलै 2022 (21:24 IST)
गेली काही वर्ष भद्रकाली प्रॅाडक्शनचे मराठी व्यावसायीक रंगभूमी गाजवणारे नाटक म्हणजे प्राजक्त देशमुखलिखित दिग्दर्शीत “संगीत देवबाभळी”. ह्या नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बीए मराठी प्रथम वर्षासाठी हे पुस्तक २०२२ पासून अभ्यासक्रमाला असेल.
 
पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या संगीत देवबाभळी या नाटकाला अनेक महत्वाचे ४२ च्या वर पुरस्कार प्राप्त झाले असून नुकताच युवा साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही या संहितेचा सन्मान झाला आहे. भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची अद्रूत वीण प्राजक्त देशमुख यांनी या नाटकातून गुंफली आहे. देवत्व लाभलेल्या लखुबाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. हे नाटक आता महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. देवरूख येथील शिक्षण प्रसारक मंडळाने यापूर्वीच आपल्या संस्थेत संगीत देवबाभळी नाटक अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. विजया मेहता, स्व. जयंत पवार , डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकर आणि अशा असंख्य रंगभूमीवरच्या महारथींनी ह्या नाचराचे कौतुक केले आहे. राज्य पुरस्कार ते साहित्य अकादमी ह्या प्रवासानंतर महत्वाच्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात संहीता आल्याने पुन्हा एकदा नाटकाचे साहित्यमूल्य अधोरेखित झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Men Health Tips: हळदीचे सेवन केल्याने पुरुषांना मिळतात आश्चर्यकारक फायदे, या प्रकारे वापरा