Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात १,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात १,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:40 IST)
राज्यात मंगळवारी १,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,३०,२७४ झाली आहे. राज्यात ४१,५८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,१३९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, अहमदनगर ३, नंदूरबार ४, पुणे २, सोलापूर २, नागपूर ३, चंद्रपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३० मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
तर ४,०११ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,३६,३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,०६,९९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३०,२७४ (१३.८० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,१२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार : आदित्य ठाकरे