राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यातील परिस्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मंगळवारी १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकाही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. राज्यात सध्या ९६० इतके अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर १०७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२४,९८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,०८,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७३,७२२ (०९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील सोमवारची स्थिती पाहिली असता २४ तासांत ११० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नव्हती. परंतु तुलनेत ७ रूग्ण कमी झाले असून १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.