Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात २,७७९ नवीन रुग्णांची नोंद, मृत्यूदर २.५३ टक्के

राज्यात २,७७९ नवीन रुग्णांची नोंद, मृत्यूदर २.५३ टक्के
, शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:01 IST)
राज्यात शुक्रवारी २,७७९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,०३,६५७ झाली आहे. राज्यात ४४,९२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,६८४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, ठाणे ५, कल्याण-डोंबिवली मनपा १०, नाशिक ३, अहमदनगर ३, जळगाव ४, जालना ३ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ५० मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे ९, नाशिक २, अमरावती १, नागपूर १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
तर ३,४१९ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत एकूण १९,०६,८२७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ (१४.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१३,४१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसीकरणाच्या चौथ्या दिवशी ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस