Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण, मृत्यू दर २.५७ टक्के

राज्यात २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण, मृत्यू दर २.५७ टक्के
, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (09:45 IST)
महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.४ टक्के इतका झाला आहे. राज्यात २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात  ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्केआहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख ४३ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २२ हजार ४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४ लाख ५२ हजार ५३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ५७ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २२ हजार ४८ झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क नाही